22.09.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत जैन संघ रथयात्रा रवाना

राज्यपालांच्या उपस्थितीत जैन संघ रथयात्रा रवाना
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला प्रार्थना समाज मुंबई येथुन हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, भक्तियोग आचार्य यशोविजय महाराज, अचल गच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वर महाराज तसेच जैन संघांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
तीर्थंकर भगवान महावीर यांनी समाजाला अहिंसा, सत्य आणि करुणा ही तत्त्वे दिली आहेत. ही रथयात्रा भगवान महावीरांच्या शिकवणीची आठवण करून देणारी आहे असे सांगून महावीरांची तत्वज्ञान आज विशेष प्रासंगिक आहे असे राज्यपालांनी सांगितले
रथयात्रेत सहभागी झालेल्या जैन संघाचे अभिनंदन करुन ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.