बंद

22.09.2024- ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपालांचा बाल कर्करुग्णांशी संवाद

प्रकाशित तारीख: September 22, 2024
22.09.2024 : राज्यपालांनी ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त बाल कर्करुग्णांची घेतली भेट

‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपालांचा बाल कर्करुग्णांशी संवाद

‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २२) बाल कर्करुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या.

राज्यपालांच्या सूचनेनुसार लहान मुलांना राजभवनाची सैर करविण्‍यात आली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते.
यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय.के.सप्रू, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रु बिसेन व कार्यकारी संचालिका निता मोरे उपस्थित होते.