बंद

    22.03.2025 : क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित खासदार – अभिनेते संघातील क्रिकेट सामन्याचे राज्यपालांकडून उद्घाटन

    प्रकाशित तारीख: March 22, 2025
    22.03.2025 : क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खासदार आणि चित्रपट अभिनेत्यांच्या एका प्रदर्शनी क्रिकेट सामन्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी MCA मैदानावर केले. या सामन्यात खासदारांच्या 'नेता इलेव्हन' संघाचे नेतृत्व माजी मंत्री आणि खासदार अनुराग ठाकूर यांनी केले तर चित्रपट अभिनेत्यांच्या संघाचे नेतृत्व सुनील शेट्टी यांनी केले. या सामन्यात खासदार श्रीकांत शिंदे, मोहम्मद अझरुद्दीन, युसूफ पठाण, मनोज तिवारी, चंद्रशेखर, दिनेश शाक्य, गुरमीत सिंह, कमलेश पासवान, निशिकांत दुबे, के सुधाकर, लवू कृष्णा हे खासदार संसद सदस्यांच्या नेता संघाकडून खेळले. तर चित्रपट कलाकार अनुपम खेर, सोहेल खान, जॅकी श्रॉफ, शरद केळकर यांनी अभिनेते इलेव्हनचे प्रतिनिधित्व केले. अभिनेते अर्जुन रामपाल, सोनू सूद व तुषार कपूर हे देखील यावेळी उपस्थित होते.

    क्षयरोग हरेल, देश जिंकेल

    क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित खासदार – अभिनेते संघातील क्रिकेट सामन्याचे राज्यपालांकडून उद्घाटन

    क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खासदार आणि चित्रपट अभिनेत्यांच्या एका प्रदर्शनी क्रिकेट सामन्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी (दि. २२) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर केले.

    या सामन्यात खासदारांच्या ‘नेता इलेव्हन’ संघाचे नेतृत्व माजी मंत्री आणि खासदार अनुराग ठाकूर यांनी केले तर चित्रपट अभिनेत्यांच्या संघाचे नेतृत्व सुनील शेट्टी यांनी केले.

    टीबी हा संसर्गजन्य रोग असून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याचे सांगून भारताने पोलिओवर विजय मिळवला तसेच लवकरच क्षय रोगावर देखील पूर्ण विजय मिळवला जाईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. क्रिकेटच्या माध्यमातून क्षयरोगाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी खासदार अनुराग ठाकूर यांचे अभिनंदन केले.

    या सामन्यात खासदार श्रीकांत शिंदे, मोहम्मद अझरुद्दीन, युसूफ पठाण, मनोज तिवारी, चंद्रशेखर, दिनेश शाक्य, गुरमीत सिंह, कमलेश पासवान, निशिकांत दुबे, के सुधाकर, लवू कृष्णा हे खासदार संसद सदस्यांच्या नेता संघाकडून खेळले.

    तर चित्रपट कलाकार अनुपम खेर, सोहेल खान, जॅकी श्रॉफ, शरद केळकर, यांनी अभिनेते इलेव्हनचे प्रतिनिधित्व केले. अभिनेते अर्जुन रामपाल, सोनू सूद व तुषार कपूर हे देखील यावेळी उपस्थित होते.