बंद

    21.07.2026: राज्यपालांचा राज्यातील विद्यापीठांच्या क्रीडा प्रमुखांशी संवाद

    प्रकाशित तारीख : July 21, 2026
    21.07.2026: राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा संचालकांशी संवाद साधला. विकसित भारत निर्माण करण्यात खेळांची भूमिका देखील  महत्वाची आहे असे सांगून विद्यापीठांनी महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर 'स्पोर्ट्स इकोसिस्टिम' तयार करावी असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे व मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ मनोज रेड्डी यांनी सादरीकरण केले.

    राज्यपालांचा राज्यातील विद्यापीठांच्या क्रीडा प्रमुखांशी संवाद; विद्यापीठांनी खेळांसाठी पोषक वातावरण तयार करण्याची सूचना

    राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा संचालकांशी संवाद साधला.

    आज खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ व क्रीड़ा प्रकारांना पोषक वातावरण तयार करुन देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    समर्थ व शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी खेळ हा महत्वाचा घटक आहे. खरे शिक्षण बंद वर्गखोलीच्या बाहेर होते असे सांगून खेळांमधील सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, खिलाडू वृत्ती, संवाद, सहनशक्ती व कठोर परिश्रम करण्याची भावना विकसित होते असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्राकडे क्रीडा विकासाची मोठी ताकत आहे. राज्याने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले आहेत. पूर्वी क्रीडाप्रकारांना ‘अभ्यासेतर उपक्रम’ समजले जायचे परंतु आज खेळ व क्रीडा ‘सहअभ्यासक्रम’ झाला आहे असे सांगून विद्यापीठांनी खेळांमध्ये ग्रामीण व आदिवासी युवकांना देखील सहभागी होण्यास प्रेरित करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

    विकसित भारत निर्माण करण्यात खेळांची भूमिका देखील महत्वाची आहे असे सांगून विद्यापीठांनी महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर ‘स्पोर्ट्स इकोसिस्टिम’ तयार करावी असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे व मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ मनोज रेड्डी यांनी सादरीकरण केले.

    राज्यपाल ने राज्य विश्वविद्यालयों के खेल विभागाध्यक्षों से संवाद किया; खेल-अनुकूल वातावरण निर्माण का आह्वान

    महाराष्ट्र के राज्यपाल एवं राज्य विश्वविद्यालयों के कुलाधिपति जिष्णु देव वर्मा ने आज राज्य के सभी विश्वविद्यालयों के खेल विभागाध्यक्षों एवं खेल निदेशकों से संवाद किया।

    बैठक को संबोधित करते हुए राज्यपाल ने कहा कि आज के समय में खेल अत्यंत प्रतिस्पर्धी और पेशेवर हो चुके हैं। इस परिप्रेक्ष्य में उन्होंने विश्वविद्यालयों से खेल-अनुकूल वातावरण तैयार करने तथा ऐसे प्रतिभाशाली खिलाड़ियों को विकसित करने का आह्वान किया जो राष्ट्र का गौरव बढ़ा सकें।

    राज्यपाल ने कहा कि खेल एक सशक्त और सक्षम राष्ट्र निर्माण का अनिवार्य घटक हैं। उन्होंने यह भी रेखांकित किया कि वास्तविक शिक्षा केवल कक्षा की चार दीवारों तक सीमित नहीं है। खेलों में भागीदारी से विद्यार्थियों में टीम भावना, खेलभावना, संवाद कौशल, सहनशीलता और परिश्रम की क्षमता विकसित होती है।

    उन्होंने कहा कि महाराष्ट्र में खेल विकास की अपार संभावनाएँ हैं और यहाँ से अनेक राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय स्तर के खिलाड़ी उभरे हैं। उन्होंने विश्वविद्यालयों से ग्रामीण एवं आदिवासी युवाओं की अधिकाधिक भागीदारी सुनिश्चित करने का आग्रह किया।

    राज्यपाल ने यह भी कहा कि विकसित भारत के निर्माण में खेलों की महत्वपूर्ण भूमिका है। उन्होंने विश्वविद्यालयों से कॉलेज और विश्वविद्यालय स्तर पर व्यापक खेल पारिस्थितिकी तंत्र विकसित करने का आह्वान किया।

    इस अवसर पर शिवाजी विश्वविद्यालय के खेल निदेशक डॉ. शरद बंसोडे तथा मुंबई विश्वविद्यालय के खेल विभाग निदेशक डॉ. मनोज रेड्डी ने अपने प्रस्तुतीकरण दिए।