बंद

    21.05.2025: राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

    प्रकाशित तारीख : May 21, 2025
    २१.०५.२०२५: दहशतवाद विरोधी दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी लोकभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा वाचून दाखवली. याप्रसंगी राज्यपालांसोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. रामामूर्ती, राजभवन आणि राज्य पोलिसांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी राज्यपालांसोबत शपथ वाचून दाखवली.

    राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

    राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.

    भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी (२१ मे) दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येते. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व जवानांनी यावेळी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.

    अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.