बंद

    21.02.2023 : डॉ नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: February 21, 2023

    डॉ नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    राज्यपाल रमेश बैस यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    राज्यपालांनी डॉ नीलम गोऱ्हे यांना दूरध्वनी करून त्यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल आपल्या शोकसंवेदना कळवल्या.