बंद

    20.08.2025:- राजभवन येथे सद्भावना प्रतिज्ञा

    प्रकाशित तारीख: August 20, 2025
    Raj Bhavan Officers & staff take Sadbhavana Day Pledge, Birth Anniversary of late PM Rajiv Gandhi

    राजभवन येथे सद्भावना प्रतिज्ञा

    दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

    दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे आज (दि. २० ऑगस्ट) त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    राज्यपालांचे उपसचिव तसेच परिवार प्रबंधक एस. राममूर्ती यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा देण्यात आली.

    “जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडवण्याची” प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली. दिवंगत राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते.