20.05.2026: सायप्रस अध्यक्षांचे मुंबई येथे आगमन
सायप्रस अध्यक्षांचे मुंबई येथे आगमन
सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलिडेस यांचे आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले.