बंद

    20.05.2026: राज्यपालांच्या हस्ते भिकू इदाते, रवींद्र प्रभूदेसाई यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख : May 21, 2026
    20.05.2026:  भटके विमुक्त विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व समरसता मंचचे दीर्घ काळ कार्याध्यक्ष राहिलेले पद्मश्री भिकुजी (दादा) इदाते यांच्या इंग्रजी अनुवादित पिलग्रीम ऑफ समरसता या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे झाले. नीलिमा देशपांडे यांनी दादा इदाते यांच्या जीवन कार्यावर लिहिलेल्या 'समरसतेचा वारकरी' या ग्रंथाचे सदर ग्रंथ हे इंग्रजी भाषांतर असून ऋतुराज पत्की यांनी ते अनुवादित केले आहे. ग्रंथाला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे.  राज्यपालांच्या हस्ते आज उद्योजक तसेच पितांबरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ रवींद्र प्रभूदेसाई यांच्या 'आधुनिक शेतीचे मॉडेल' व 'आपलं कोकण' या दोन पुस्तकांचे देखील लोकभवन येथे प्रकाशन करण्यात आले.  पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हिंदुस्तान प्रकाशन संस्था व साप्ताहिक विवेकचे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे तसेच साप्ताहिक विवेक तसेच पितांबरी उद्योग समूहातील संचालक उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते भिकू इदाते, रवींद्र प्रभूदेसाई यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

    वाढदिवस तसेच विवाह प्रसंगी ग्रंथ भेट देण्याची प्रथा सुरू व्हावी: राज्यपाल

    भटके विमुक्त विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व समरसता मंचचे दीर्घ काळ कार्याध्यक्ष राहिलेले पद्मश्री भिकु (दादा) इदाते यांच्या इंग्रजी अनुवादित ‘पिलग्रीम ऑफ समरसता’ या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते बुधवारी (दि. २०) महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे झाले.

    नीलिमा देशपांडे यांनी दादा इदाते यांच्या जीवन कार्यावर लिहिलेल्या ‘समरसतेचा वारकरी’ या ग्रंथाचे सदर ग्रंथ हे इंग्रजी भाषांतर असून ऋतुराज पत्की यांनी ते अनुवादित केले आहे. ग्रंथाला सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे.

    राज्यपालांच्या हस्ते आज उद्योजक तसेच पितांबरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ रवींद्र प्रभूदेसाई यांच्या ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ व ‘आपलं कोकण’ या दोन पुस्तकांचे देखील लोकभवन येथे प्रकाशन करण्यात आले.

    भिकू इदाते यांच्या पुस्तकामुळे वाचकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता तसेच इतर आंदोलनाची माहिती होईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    आज तंत्रज्ञानाच्या काळात देखील ग्रंथांचे महत्त्व कायम असून ग्रंथ हाती धरून वाचणे हा अद्भुत अनुभव असतो असे राज्यपालांनी सांगितले.

    नवी पिढी ग्रंथ वाचन करीत नाही हा समज चुकीचा आहे असे सांगून नव्या पिढीने वाचनाचे केवळ व्यासपीठ बदलले आहे असे आपणास वाटते असे राज्यपालांनी सांगितले.

    वाढदिवस तसेच विवाह प्रसंगी ग्रंथ भेट देण्याची प्रथा सुरू व्हावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

    लेखक भिकू इदाते यांनी आपल्या प्रास्ताविकातून समरसता मंचाची निर्मिती, त्या माध्यमातून हाती घेतलेली वेगवेगळी आंदोलने, फुले आंबेडकर संदेश यात्रा, विमुक्त व भटक्या समाजाची स्थिती इत्यादी विषयांवर विवेचन केले.

    ‘पितांबरी’चे रवींद्र प्रभुदेसाई यांनी ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ व ‘आपलं कोकण’ या ग्रंथांविषयी माहिती दिली.

    पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हिंदुस्तान प्रकाशन संस्था व साप्ताहिक विवेकचे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे तसेच साप्ताहिक विवेक तसेच पितांबरी उद्योग समूहातील संचालक उपस्थित होते.

    राज्यपाल के हाथों भिकू इदाते तथा रवींद्र प्रभू देसाई की पुस्तकों का लोकार्पण

    भटके विमुक्त विकास परिषद के संस्थापक अध्यक्ष तथा समरसता मंच के दीर्घकालीन कार्याध्यक्ष रहे पद्मश्री भिकू (दादा) इदाते की अंग्रेज़ी में अनूदित पुस्तक ‘पिलग्रिम ऑफ समरसता’ का लोकार्पण राज्यपाल जिष्णु देव वर्मा के हाथों बुधवार (दि. 20) को मुंबई स्थित महाराष्ट्र लोकभवन में सम्पन्न हुआ।

    यह पुस्तक नीलिमा देशपांडे द्वारा दादा इदाते के जीवनकार्य पर लिखी गई मराठी पुस्तक ‘समरसतेचा वारकरी’ का अंग्रेज़ी अनुवाद है, जिसका अनुवाद ऋतुराज पत्की ने किया है। पुस्तक की प्रस्तावना डॉ मोहन भागवत ने लिखी है।

    इसी अवसर पर राज्यपाल के हाथों उद्योगपति तथा ‘पितांबरी’ समूह के प्रबंध निदेशक डॉ. रवींद्र प्रभू देसाई की ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ तथा ‘आपलं कोकण’ इन दो पुस्तकों का भी लोकार्पण किया गया।

    इस अवसर पर राज्यपाल ने कहा कि भिकू इदाते की पुस्तक के माध्यम से पाठकों को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के समरसता आंदोलन की जानकारी प्राप्त होगी। उन्होंने कहा कि तकनीक के इस युग में भी पुस्तकों का महत्व कायम है तथा हाथ में पुस्तक लेकर पढ़ने का अनुभव अद्भुत होता है।

    राज्यपाल ने यह भी कहा कि नई पीढ़ी पुस्तकें नहीं पढ़ती, यह धारणा गलत है। उनके अनुसार नई पीढ़ी ने केवल पढ़ने का माध्यम बदला है।

    उन्होंने जन्मदिन तथा विवाह जैसे अवसरों पर पुस्तकें उपहार में देने की परंपरा शुरू होने की अपेक्षा व्यक्त की।

    लेखक भिकू इदाते ने अपने प्रास्ताविक में समरसता मंच की स्थापना, उसके माध्यम से चलाए गए विभिन्न आंदोलन, फुले-आंबेडकर संदेश यात्रा तथा विमुक्त एवं भटके समाज की स्थिति आदि विषयों पर विस्तार से विचार व्यक्त किए।

    ‘पितांबरी’ समूह के रवींद्र प्रभू देसाई ने अपनी पुस्तकों ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ तथा ‘आपलं कोकण’ के विषय में जानकारी दी।

    पुस्तक लोकार्पण समारोह में हिंदुस्तान प्रकाशन संस्था एवं साप्ताहिक ‘विवेक’ के मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे सहित साप्ताहिक ‘विवेक’ तथा पितांबरी उद्योग समूह के पदाधिकारी उपस्थित थे।

    Governor releases books by Bhiku Idate, Ravindra Prabhudesai