20.02.2025: राज्यपालांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

राज्यपालांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज गुरुवारी (दि. २०) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.