बंद

    20.02.2024: राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात

    प्रकाशित तारीख: February 21, 2024

    राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात

    राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने मंगळवारी (दि. २०) राज्य विधानमंडळाच्या २०२४ वर्षातील पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली.

    विधान मंडळ प्रांगण येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.