बंद

    19.12.2022 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आव्हान आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन

    प्रकाशित तारीख: December 19, 2022

    राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आव्हान आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन

    राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत जळगाव येथे आजपासून सुरु होणाऱ्या दहा दिवसांच्या ‘आव्हान – २०२२’ या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

    दिनांक १९ ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या या शिबीराचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.

    कार्यक्रमाला जळगाव येथून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी, प्र कुलगुरु सोपान इंगळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, एनडीआरएफचे सहायक कंमाडर निखिल मुधोळकर, कुलसच‍िव विनोद पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्रशांत कुमार वानंजे, प्राध्यापक व सर्व जिल्हांमधील रासेयो स्वयंसेवक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.