बंद

    19.11.2023 : राजभवन येथे इंदिरा गांधी यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: November 19, 2023

    राजभवन येथे इंदिरा गांधी यांना अभिवादन

    दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १०६ व्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र राजभवन येथे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

    राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त सिंघल यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

    देशाचे स्वातंत्र्य आणि एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची, तसेच धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली.

    यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.