बंद

    19.08.2022: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे लातूर विमानतळावर आगमन, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडून स्वागत

    प्रकाशित तारीख: August 19, 2022

    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे लातूर विमानतळावर आगमन, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडून स्वागत

    लातूर,दि.19(जिमाका):- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे लातूर विमानतळ येथे आगमन झाले.यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी स्वागत केले.

    आ.रमेशअप्पा कराड,आ. अभिमन्यू पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,मा.आ.सुधाकर भालेराव, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनीही यावेळी त्यांचे स्वागत केले.

    विमानतळावरून बीड जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यासाठी राज्यपाल यांचे प्रयाण झाले. उद्या बीड दौऱ्यावरून सकाळी 10.15 वाजता लातूर येथे येणार असून त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड यांचे अधिकारी आणि रेड क्रॉस सोसायटीचे अधिकारी यांच्यासोबत चर्चासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे.