19.07.2022: श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती
श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती
करोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची आरती केली.
यावेळी दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या कोळी बांधवांनी नृत्य केले.
अनेक दशकांची परंपरा असलेली ही जत्रा करोनामुळे दोन वर्षे झाली नव्हती.