बंद

    19.04.2025: ईस्टर निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: April 19, 2025

    ईस्टर निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ईस्टरनिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा पवित्र दिवस आहे. आशा व नवारंभाचा हा दिवस सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व शांती घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना ईस्टरनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.