बंद

    19.03.2025: न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत

    प्रकाशित तारीख: March 19, 2025
    19.03.2025:  Governor welcomes NZ PM Christopher Luxon at Raj Bhavan

    न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत
    राजभवन येथील स्नेहभोजनाला क्रिकेटपटू एजाज पटेल उपस्थित

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन तसेच यांचेसह आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे राज्याच्या वतीने राजभवन, मुंबई येथे स्वागत केले. यावेळी बैठकीत हरित ऊर्जा, क्रीडा, शिक्षण, कृषी तंत्रज्ञान, मत्स्यपालन, यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.

    यावेळी आयोजित स्नेहभोजन समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, तर न्यूझीलंडच्या वतीने भारतीय वंशाचे माजी गव्हर्नर जनरल सर आनंद सत्यानंद, क्रिकेटपटू एजाज पटेल, पंतप्रधान कार्यालयाचे माध्यम अधिकारी मायकेल फोर्ब्स, अतिरिक्त मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, न्यूझीलंड पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी मॅट यंग, समाजमाध्यम सल्लागार जेकब ओ’फ्लाहर्टी, मार्क टॅलबोट, न्यूझीलंडचे भारतातील उच्चायुक्त पॅट्रिक राटा, जोआना केम्पकर्स, मॅथ्यू आयर्स, मुंबईतील उप-उच्चायुक्त ग्राहम राऊस व उद्योजक हे देखील उपस्थित होते.