बंद

    19.02.2026 : शिव जयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : February 19, 2026
    शिव जयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

    शिव जयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    अभिवादन कार्यक्रमानंतर बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे क्रीडा भवन येथे शिव जयंती कार्यक्रम संपन्न झाला. याठिकाणी राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत संगीत कला अकादमीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे आणि शिवगीतांचे सादरीकरण करण्यात आले.

    राज्यपालांकडून कलाकारांना कौतुकाची थाप

    संगीत कला अकादमीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शिवगीतांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दाद देत कलाकारांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

    मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, आयुक्त भूषण गगराणी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.