बंद

    19.02.2025 : शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: February 19, 2025
    शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी मुंबईचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार सुनिल शिंदे व महेश सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी, राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ प्रशांत नारनवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

    यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा भवन येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सहभागी झाले.

    यावेळी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा, पोवाडा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली शिवरायांची आरती आदी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.