बंद

    19.0.2021: करोना योदध्यांनी जनजागृतीचे कार्य करावे: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: July 19, 2021

    करोना योदध्यांनी जनजागृतीचे कार्य करावे: राज्यपाल

    करोनाचे आव्हान अदयाप संपलेले नाही. वैज्ञान‍िकांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक सजग व सचेत राहण्याची गरज आहे असे सांगतानाच करोना योध्दयांनी यानंतर करोना बाबत जनगागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    परानुभूती फाऊंडेशन व द हिंदू फाऊंडेशन यांच्या वतीने राजभवन, मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते २१ करोना योध्दांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    परानुभूती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ भुषण जाधव व द हिंदू फाऊंडेशनचे संदिप गुप्ता व्यासपिठावर उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी भारत राजपूत, माडीरेडडी कोंडा रेडडी, अमरनाथ नरहरी कोरडे, विक्रमसिंह भोसले, अजय देशमुख, शुभम नागपुरे, आर सी शाह, अजय गुजराथी, वैदयुला नरेद्र रेडडी, अलोक मेहता, धनराज सिंह पुरी, जमिल सैदी, विनय पुरशोत्तम भांगे, डॉ लोरहो फिझे, प्राजक्ता, अन‍िल जैन, रुद्र प्रसाद बिसवास, बी बी जाधव, मिरा जाधव, गुरुपाल सेठी आणि जिग्नेश हिराणी या करोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.