18.12.2024: राज्यपालांच्या हस्ते ८ व्या ‘गणवेश व वस्त्र उत्पादक मेळावा २०२४’ चे उद्घाटन
राज्यपालांच्या हस्ते ८ व्या ‘गणवेश व वस्त्र उत्पादक मेळावा २०२४’ चे उद्घाटन
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी (दि. १८ डिसें) बंगळूर येथे ८ व्या ‘गणवेश व वस्त्र उत्पादक मेळावा २०२४’ चे उद्घाटन केले.
यावेळी राज्यपालांनी विविध प्रदर्शनांना भेट दिली. प्रदर्शनात १२० हून अधिक ब्रँडने सहभाग घेतला असून राज्यपालांनी सर्व संस्थाचे कौतुक केले व त्यांना व्यवसायाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला आमदार सुभाष देशमुख, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शहा, असोसिएशनचे फेअर चेअरमन सुनील मेंगजी, असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश पवार यांचेसह निमंत्रित उपस्थित होते.