बंद

    18.11.2020 : राज्यपालांच्या हस्ते मुलुंड येथील करोना योद्ध्यांचा सत्कार

    प्रकाशित तारीख: November 18, 2020

    राज्यपालांच्या हस्ते मुलुंड येथील करोना योद्ध्यांचा सत्कार

    करोना काळात तसेच त्यानंतर जाहीर झालेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या काळात संकटात सापडलेल्या जनसामान्यांची विविध प्रकारे निःस्वार्थ सेवा करणाऱ्या मुलुंड उपनगरातील २८ करोना योद्ध्यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

    श्री. चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार मिहीर कोटेचा व सचिव दिपेश वोरा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

    सेवा करण्याची भावना मनात उद्भवणे फार महत्वाचे असते. भाव तेथे देव असतो. जगात धन, संपत्ती, व पैसा यापेक्षा श्रद्धा, समर्पण व त्याग मोठा समजला जातो. करोना आपदेच्या काळात करोना योद्ध्यांसोबतच स्वयंसेवी संस्थांनी चांगले काम केले. करोना योद्ध्यांनी यापुढेही समाज कार्य सुरूच ठेवावे तसेच आपल्या कार्यातून इतरांना समाजसेवेसाठी प्रवृत्त करावे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. करोनाला निर्भयतेने परंतु पुरेशी काळजी घेऊन तोंड दिले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी जयेश गणात्रा, राहुल जोशी, मयुर धुल्ला, अमिता शहा, जितुभाई महेता, किरण ठक्कर, माया कोठारी, रमेश मेहता, डॉ. हेमंत वेखंडे, डॉ. सरिता भिंगे, नंदकुमार वैती, डॉ. विदिशा तायडे, सचिन नेहरे, कौशिक ठक्कर, निपम भट्ट, चेतना त्रिवेदी, एल्विस कुंदर, रवि नाईक, भावना शहा, दर्शना राठोड, कपिला कोठारी, तेजल बाखाई, दिपिका घाग, प्रकाश मोटे, दिपक सचदेवा, नारायण मेघारे, अनुप थारवानी आणि पियुष वोरा यांचा सत्कार करण्यात आला.