18.10.2021: मिलादुन्नबी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मिलादुन्नबी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद ए मिलादुन्नबी निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलाद हा सण त्यांच्या मानवतावादी कार्याचे तसेच परोपकाराच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.