बंद

    18.08.2021 : राज्यपाल, माजी सैनिक कल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

    प्रकाशित तारीख: August 18, 2021

    राज्यपाल, माजी सैनिक कल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना यासाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची ४९ वी वार्षिक बैठक राजभवन येथे संपन्न झाली. सैनिक कल्याण विभागाच्या राज्यातील विविध मालमत्तांचे व्यवस्थापन, ध्वज निधीचा विनियोग, सैनिक विद्यार्थी वसतीगृहांची सध्यस्थिती व सोयीसुविधा आदी विषयांबाबत यावेळी चर्चा झाली.

    बैठकीला कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभागाचे प्रमुख मे.जन. राकेश मनोचा, रिअर एडमिरल अतुल आनंद, सैनिक कल्याण संचालक व इतर अधिकारी उपस्थित होते.