बंद

    18.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील जगन्नाथ रथयात्रेला आरंभ; झाडू घेऊन राज्यपालांनी रथयात्रेची मार्गिका स्वच्छ केली

    प्रकाशित तारीख : July 18, 2026
    18.07.2026: इस्कॉन, जुहू तर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत भक्तिवेदांत स्वामी मिशन स्कुल अंधेरी मुंबई येथून आरंभ झाला. यावेळी राज्यपालांनी रथावर आरूढ झालेल्या श्री जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या प्रतिमांची आरती केली व रथयात्रेच्या मार्गिकेला झाडूने स्वच्छ केले. रथयात्रा हा सनातन धर्म व भारतीय संस्कृतीतील एकमेवाद्वितीय अनुभव आहे.  या उत्सवानिमित्त भगवान जगन्नाथ भक्तांच्या भेटीसाठी बाहेर येतात. पूर्वी जगन्नाथ पुरी येथे तसेच काही ठिकाणी सीमित असलेला जगन्नाथ रथयात्रा महोत्सव इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी जगाच्या विभिन्न भागात पोहोचवला असे यावेळी राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे, खासदार हेमा मालिनी, आमदार अमित साटम, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ सूरदास, इस्कॉन जुहूच्या अध्यक्ष बृजहारी दास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

    राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील जगन्नाथ रथयात्रेला आरंभ; झाडू घेऊन राज्यपालांनी रथयात्रेची मार्गिका स्वच्छ केली

    इस्कॉन, जुहू तर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत भक्तिवेदांत स्वामी मिशन स्कुल अंधेरी मुंबई येथून आरंभ झाला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत राज्यपालांनी रथावर आरूढ भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या प्रतिमांची आरती केली व रथयात्रेच्या मार्गिकेला झाडून स्वच्छ केले.  

    रथयात्रा हा सनातन धर्म व भारतीय संस्कृतीतील एकमेवाद्वितीय अनुभव आहे.  या उत्सवानिमित्त भगवान जगन्नाथ मंदिरातून बाहेर पडून  भक्तांच्या  भेटीसाठी बाहेर येतात. पूर्वी जगन्नाथ पुरी तसेच काही ठिकाणी सीमित असलेला जगन्नाथ रथयात्रा महोत्सव इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी जगाच्या विभिन्न भागात पोहोचवला असे राज्यपालांनी सांगितले. 
    जो इतरांचे दुःख, कष्ट जाणतो त्यालाच ‘वैष्णव’ असे म्हणतात असे सांगून भक्तीला कृतीची जोड दिल्यास ती ईश्वरीय सेवा होते असे राज्यपालांनी सांगितले. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य भक्तीने केल्यास ती सेवा ठरते असे सांगून कृष्णभक्ती ही गीत, नृत्य साधनेच्या माध्यमातून देखील केली जाते, असे त्यांनी सांगितले.   
    आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या युगात भक्तिभाव विशेष आवश्यक आहे. त्यातूनच मानवी कल्याण साधेल असे त्यांनी सांगितले. श्रील प्रभुपाद हे वयाच्या सत्तराव्या वर्षी अमेरिकेत गेले व त्यांनी जगाला सोपा असा महामंत्र दिला असे सांगून राज्यपालांनी इस्कॉनच्या कार्याची प्रशंसा केली.
    यावेळी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेचा अनुभव मुंबईत दिल्याबद्दल इस्कॉनचे आभार मानले.
    रथयात्रा ही भक्ती, शक्ती, प्रेम व करुणेचे प्रतीक आहे. आपण नृत्यसाधनेच्या माध्यमातून कृष्णभक्ती करीत आहो. नृत्यामुळे आपण भगवान कृष्णाशी जोडून राहिलो असे खासदार हेमा मालिनी यांनी यावेळी सांगितले. 
    रथयात्रा अंधेरी येथून जुहू येथील इस्कॉन मंदिर येथे समाप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. 
    यावेळी आमदार अमित साटम, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ सूरदास, इस्कॉन जुहूच्या अध्यक्ष बृजहारी दास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.
    **
    *राज्यपाल की उपस्थिति में मुंबई में भगवान जगन्नाथ रथयात्रा का शुभारंभ; राज्यपाल ने झाड़ू लगाकर रथयात्रा मार्ग की सफाई की*
    इस्कॉन, जुहू द्वारा आयोजित 45वीं श्री जगन्नाथ रथयात्रा का शुभारंभ आज भक्तिवेदांत स्वामी मिशन स्कूल, अंधेरी, मुंबई से महाराष्ट्र के राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा की उपस्थिति में हुआ। इस अवसर पर हजारों श्रद्धालुओं की मौजूदगी में राज्यपाल ने रथ पर विराजमान भगवान जगन्नाथ, बलदेव एवं सुभद्रा की प्रतिमाओं की आरती की तथा परंपरा के अनुसार झाड़ू लगाकर रथयात्रा मार्ग की सफाई की।इस अवसर पर राज्यपाल ने कहा कि रथयात्रा सनातन धर्म और भारतीय संस्कृति का एक अद्वितीय एवं अनुपम अनुभव है। इस पर्व के अवसर पर भगवान जगन्नाथ मंदिर से बाहर निकलकर अपने भक्तों को दर्शन देने आते हैं। उन्होंने कहा कि पहले जगन्नाथ रथयात्रा मुख्यतः पुरी तथा कुछ अन्य स्थानों तक सीमित थी, लेकिन इस्कॉन के संस्थापक श्रील प्रभुपाद ने इस पवित्र परंपरा को विश्व के विभिन्न देशों तक पहुंचाया।राज्यपाल ने कहा कि जो व्यक्ति दूसरों के दुःख और कष्ट को समझता है, वही सच्चा ‘वैष्णव’ कहलाता है। उन्होंने कहा कि जब भक्ति के साथ सेवा और कर्म का समन्वय होता है, तभी वह ईश्वर की सच्ची सेवा बन जाती है। उन्होंने कहा कि यदि हम प्रत्येक कार्य को भक्तिभाव से करें, तो वही सेवा का रूप ले लेता है। उन्होंने यह भी कहा कि भगवान श्रीकृष्ण की भक्ति गीत, संगीत और नृत्य जैसी साधनाओं के माध्यम से भी की जा सकती है।राज्यपाल ने कहा कि आधुनिक तकनीक और कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) के इस युग में भक्तिभाव की आवश्यकता पहले से अधिक है। इसी भावना से मानव कल्याण का मार्ग प्रशस्त होगा। उन्होंने कहा कि श्रील प्रभुपाद 70 वर्ष की आयु में अमेरिका गए और उन्होंने पूरे विश्व को सरल एवं प्रभावी महामंत्र का संदेश दिया। राज्यपाल ने इस्कॉन द्वारा विश्वभर में किए जा रहे आध्यात्मिक एवं सांस्कृतिक कार्यों की सराहना की।इस अवसर पर बंदरगाह विकास मंत्री नितेश राणे ने कहा कि इस्कॉन ने मुंबईवासियों को पुरी की प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा का दिव्य अनुभव प्रदान किया है, जिसके लिए संस्था बधाई की पात्र है।सांसद हेमा मालिनी ने कहा कि रथयात्रा भक्ति, शक्ति, प्रेम और करुणा का प्रतीक है। उन्होंने कहा कि वे नृत्य-साधना के माध्यम से भगवान श्रीकृष्ण की भक्ति करती हैं और इसी साधना ने उन्हें सदैव श्रीकृष्ण से जोड़े रखा है।बताया गया कि रथयात्रा अंधेरी से प्रारंभ होकर जुहू स्थित इस्कॉन मंदिर में संपन्न होगी।इस अवसर पर विधायक अमित साटम, हिंदुजा समूह के अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सव के अध्यक्ष डॉ. सूरदास, इस्कॉन जुहू के अध्यक्ष बृजहारी दास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तथा बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित थे।