बंद

    18.05.2026: राज्यपालांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

    प्रकाशित तारीख : May 18, 2026
    18.05.2026: मतिमंद व अनाथ मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या काष्ठशिल्प कलाकृतींच्या प्रदर्शनाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट दिली व दिव्यांग कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले. यावेळी राज्यपालांनी काष्ठ शिल्प कलाकारांशी संवाद साधला तसेच शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. शंकरबाबा पापळकर यांनी यावेळी राज्यपालांना विविध काष्ठशिल्पांच्या वैशिष्ट्याची माहिती दिली. आगमनप्रसंगी शंकरबाबा पापळकर तसेच पु ल देशपांडे अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. अंबादास पंत वैद्य बेवारस दिव्यांग बालगृह, वझ्झर, जिल्हा अमरावती येथील अनाथ मुलांनी सागवान व बेल आदी लाकडापासून विविध काष्ठशिल्पे साकारली असून या कलाकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. काष्ठ कलाकृतींचे प्रदर्शन दिनांक १८ मे पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.  यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कलादालनाच्या क्युरेटर वर्षा कारळे तसेच छायाचित्रकार शिरीष कारळे उपस्थित होते.

    राज्यपालांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

    मतिमंद व अनाथ मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या काष्ठशिल्प कलाकृतींच्या प्रदर्शनाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज भेट दिली व दिव्यांग कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले.

    यावेळी राज्यपालांनी काष्ठ शिल्प कलाकारांशी संवाद साधला तसेच शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. शंकरबाबा पापळकर यांनी यावेळी राज्यपालांना विविध काष्ठशिल्पांच्या वैशिष्ट्याची माहिती दिली.

    आगमनप्रसंगी शंकरबाबा पापळकर तसेच पु ल देशपांडे अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

    पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. अंबादास पंत वैद्य बेवारस दिव्यांग बालगृह, वझ्झर, जिल्हा अमरावती येथील अनाथ मुलांनी सागवान व बेल आदी लाकडापासून विविध काष्ठशिल्पे साकारली असून या कलाकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. काष्ठ कलाकृतींचे प्रदर्शन दिनांक १८ मे पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कलादालनाच्या क्युरेटर वर्षा कारळे तसेच छायाचित्रकार शिरीष कारळे उपस्थित होते.

    **
    राज्यपाल ने दिव्यांग एवं अनाथ बच्चों की काष्ठशिल्प प्रदर्शनी का किया अवलोकन

    महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज मुंबई में शंकरबाबा पापळकर द्वारा आयोजित काष्ठशिल्प कलाकृतियों की प्रदर्शनी का दौरा किया तथा दिव्यांग कलाकारों द्वारा तैयार की गई कलाकृतियों का अवलोकन किया।

    इस अवसर पर राज्यपाल ने काष्ठशिल्प कलाकारों से संवाद किया और शंकरबाबा पापळकर द्वारा दिव्यांग एवं अनाथ बच्चों के लिए किए जा रहे कार्यों की सराहना की। शंकरबाबा पापळकर ने राज्यपाल को विभिन्न काष्ठशिल्प कलाकृतियों की विशेषताओं एवं उनकी निर्माण प्रक्रिया की जानकारी दी।

    आगमन पर शंकरबाबा पापळकर तथा मीनल जोगलेकर, निदेशक, पु ल देशपांडे अकादमी ने राज्यपाल का स्वागत किया।

    पद्मश्री शंकरबाबा पापळकर के मार्गदर्शन में अमरावती जिले के वझ्झर स्थित स्वर्गीय अंबादास पंत वैद्य बेवारस दिव्यांग बालगृह के अनाथ बच्चों ने सागवान, बेल तथा अन्य लकड़ियों से विभिन्न काष्ठशिल्प तैयार किए हैं। इन कलाकृतियों को बिक्री हेतु प्रदर्शनी में रखा गया है। यह प्रदर्शनी 18 मई तक आम नागरिकों के लिए खुली रहेगी।

    इस अवसर पर राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कला दीर्घा की क्यूरेटर वर्षा कारळे तथा छायाचित्रकार शिरीष कारळे भी उपस्थित थे।

    **