18.03.2024- राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत दापोलीतील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत दापोलीतील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ४२ वा दीक्षांत समारोह आज महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.
दीक्षांत समारोहाला भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पदमभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय भावे, विद्यापीठाचे अधिकारी, अधिष्ठाता, विविध प्राधिकरणांचे सदस्य, माजी विद्यार्थी व अध्यापक उपस्थित होते.
दीक्षांत समारोहात एकूण २१८८ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. एकूण २७ उमेदवारांना पीएचडी तर १७ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.