बंद

    18.02.2026: विवेक भीमनवार लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी लोकभवन येथे राज्यपालांकडून शपथ

    प्रकाशित तारीख : February 18, 2026
    Vivek Bhimanwar sworn in as Chairman of MPSC; Governor administers oath at Lok Bhavan

    विवेक भीमनवार लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी
    लोकभवन येथे राज्यपालांकडून शपथ

    भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना आज (बुध. १८) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाची शपथ देण्यात आली.

    लोकभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

    शपथविधीनंतर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमनवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

    भीमनवार यांची नियुक्ती सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाची ६२ वर्षे पूर्ण करेपर्यंत (जे अगोदर येईल तेथपर्यंत) करण्यात आली आहे.

    शपथविधी सोहळ्याला आयोगाचे माजी अध्यक्ष रजनीश सेठ, कार्यवाहू अध्यक्ष डॉ अभय वाघ, आयोगाचे सदस्य, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, शासनाचे अधिकारी तसेच भीमनवार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विवेक भीमनवार यांच्या नियुक्तीची सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना वाचली.

    ‘वंदेमातरम’ने शपथविधी सोहळ्याची सुरुवात

    केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर समारोप वंदेमातरम व राष्ट्रगीताने झाला.

    **

    विवेक भीमनवार बने महाराष्ट्र लोकसेवा आयोग के अध्यक्ष; राज्यपाल ने दिलाई शपथ

    भारतीय प्रशासनिक सेवा के वरिष्ठ अधिकारी विवेक आशा लक्ष्मीकांत भीमनवार को आज (बुधवार, 18) महाराष्ट्र लोकसेवा आयोग के अध्यक्ष पद की शपथ दिलाई गई।

    लोकभवन में आयोजित एक संक्षिप्त शपथग्रहण समारोह में राज्यपाल आचार्य देवव्रत ने भीमनवार को पद एवं गोपनीयता की शपथ दिलाई।

    शपथग्रहण के बाद राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पुष्पगुच्छ देकर भीमनवार को बधाई दी।

    भीमनवार की नियुक्ति छह वर्ष की अवधि के लिए या 62 वर्ष की आयु पूर्ण करने तक (जो भी पहले हो) की गई है।

    समारोह में आयोग के पूर्व अध्यक्ष रजनीश सेठ, कार्यवाहक अध्यक्ष डॉ. अभय वाघ, आयोग के अन्य सदस्य, मुख्यमंत्री के सचिव श्रीकर परदेशी, शासकीय अधिकारी तथा श्री भीमनवार के परिवारजन उपस्थित थे।

    कार्यक्रम की शुरुआत में राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे ने विवेक भीमनवार की नियुक्ति संबंधी सामान्य प्रशासन विभाग की अधिसूचना का वाचन किया।

    शपथग्रहण समारोह की शुरुआत ‘वंदे मातरम्’ से हुई। केंद्र सरकार के निर्देशानुसार कार्यक्रम का आरंभ वंदे मातरम्, राष्ट्रगान और राज्यगीत से हुआ तथा समापन वंदे मातरम् और राष्ट्रगान के साथ किया गया।