17.12.2024: राज्यपालांचे राजभवन नागपूर येथे चहापान
राज्यपालांचे राजभवन नागपूर येथे चहापान
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितांसाठी चहापानाचे आयोजन केले. यावेळी राज्यपालांनी निमंत्रितांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्रिमंडळातील सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, संपादक तसेच इतर गणमान्य अतिथी उपस्थित होते.
यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजून कार्यक्रमाची सुरुवात व सांगता केली.