17.09.2025: प्रबोधनकार ठाकरे यांना राजभवन येथे अभिवादन

प्रबोधनकार ठाकरे यांना राजभवन येथे अभिवादन
दिवंगत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. १७) राजभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रबोधनकारांच्या तैलचित्राला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक निशिकांत देशपांडे तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.