17.09.2024 : राज्यपालांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे घेतले दर्शन

राज्यपालांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे घेतले दर्शन
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यांनी यावेळी गणरायाची आरती केली.
राज्यपालांनी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी राज्यपालांचे स्वागत केले.