17.08.2021 : राज्यपाल कोश्यारी यांची सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाला भेट
राज्यपाल कोश्यारी यांची सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाला भेट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. १७) किवळे, पुणे येथील सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाला भेट दिली आणि उपस्थितीत विभाग प्रमुख व शिक्षकांशी संवाद साधला.
कौशल्य शिक्षण ही काळाची गरज असून युवकांना रोजगारक्षम, स्वयं-रोजगार निर्माते, व उद्यमशील बनविण्यासाठी राज्यातील पहिले कौशल्य विद्यापीठ असलेले सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक शिक्षण विद्यापीठ अतिशय चांगले कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाचे ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्व अध्यापक मंडळींनी एकदिलाने योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ शांताराम मुजुमदार, प्र-कुलपती स्वाती मुजुमदार व कुलगुरु डॉ अश्विनी कुमार शर्मा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाच्या रिटेल सेंटर, ब्युटी ॲण्ड वेलनेस सेंटर तसेच अभियांत्रिकी कौशल्य केंद्राला भेट दिली.