17.03.2022: राज्यपालांच्या उपस्थितीत इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस या संस्थेतर्फे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
राज्यपालांच्या उपस्थितीत इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस या संस्थेतर्फे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस या संस्थेतर्फे होळी-धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणाऱ्या ‘रहे ना रहे हम, महेका करेंगे’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा प्रीती मेहता, सुनील मेहता, अशोक भाई व इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी गायिका मिस्तु बर्धन व राजेश प्रसाद यांनी लता मंगेशकर यांची गाणी सादर केली.