17.02.2023 : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन
महाराष्ट्राचे नामनिर्देशित राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. श्री बैस दिनांक १८ फेब्रुवारी रोजी राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.