बंद

    16.11.2021 उत्तराखंड राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे अपणू उत्तराखंड

    प्रकाशित तारीख: November 16, 2021

    उत्तराखंड राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे अपणू उत्तराखंड
    राज्यपालांची नित्यानंद स्वामी यांना आदरांजली

    नित्यानंद स्वामी फार कमी काळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले, मात्र त्या अल्पकाळात देखील त्यांनी मंत्री या नात्याने आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. टेहरी गढवाल प्रकल्प पूर्ण करताना असंख्य अडचणी आल्या, परंतु त्यांनी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळेच अशक्य वाटत असलेला तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    उत्तराखंड राज्य स्थापनेला २१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘अपणू उत्तराखण्ड’ या सांस्कृतिक संध्येचे सोमवारी (दि. १५) राजभवन मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

    श्री नित्यानंद स्वामी जनसेवा समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    उत्तराखंडचे प्रथम मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नित्यानंद स्वामी हे अतिशय संघर्षशील नेते होते. ते एक यशस्वी वकील तसेच समर्पित समाजसेवक होते. राजकारणात त्यांना मोठमोठी पदे मिळाली, परंतु त्यांनी आपली विनम्रता टिकवून ठेवली असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    यावेळी लोकगायिका पद्मश्री बसंती देवी बिश्त यांनी लोकगीते सदर केली. विकास भारद्वाज, सृष्टी काला, व अमन रातुडी यांनी देखील गीते सदर केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्व सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

    समितीचे अध्यक्ष आर के बक्षी, उपाध्यक्ष ज्योत्स्ना शर्मा व विनायक शर्मा स्वामी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील शायना एन सी, हिमानी शिवपुरी, चित्राक्षी तिवारी, श्रुती पंवर व दीपक दोब्रीयाल उपस्थित होते.