16.09.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे होणार क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात; निक्षय मित्रांचा सत्कार
निमंत्रण
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे होणार क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात; निक्षय मित्रांचा सत्कार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात होणार आहे.
यावेळी ज्या व्यक्तींनी किंवा संस्थांनी क्षयरुग्ण दत्तक घेऊन त्यांची काळजी घेण्याची तयारी दर्शविली आहे अश्या निक्षय मित्रांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना पौष्टिक धान्य किट दिले जाणार आहेत.
या कार्यक्रमास इलेकट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, छयाचित्रकार तसेच पत्रकार निमंत्रित आहेत. कृपया १०.४५ वाजेपर्यंत उपस्थित राहावे ही विनंती.