बंद

    16.04.2022 : विविध देशांच्या प्रतिनिधींसह राज्यपालांनी पाहिला ‘काश्मीर फाईल्स

    प्रकाशित तारीख: April 16, 2022

    विविध देशांच्या प्रतिनिधींसह राज्यपालांनी पाहिला ‘काश्मीर फाईल्स

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. १६) मुंबई येथे कार्यरत असलेले निवडक देशांचे वाणिज्यदुत व व्यापार प्रतिनिधींसह ‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहिला.

    चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन या संस्थेतर्फे करण्यात आले होते.

    यावेळी न्यूझीलंडचे वाणिज्यदूत तसेच डीन ऑफ कॉन्सुलर कोर राल्फ हेस, इस्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी, श्रीलंकेचे वाणिज्यदूत डॉ वाल्सन वेथोडी, अर्जेंटिनाचे वाणिज्यदूत गिलरमो एडवर्दो डेव्होतो व इंडोनेशियाचे कॉन्सल एक्नॉसुर प्रामुख्याने उपस्थित होते.

    आमदार आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ विजय पागे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.