बंद

    15.12.2025: स्वयंसिध्दा उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्री शक्ती’ ॲप वरती जास्तीत जास्त नोंदणी करावी : राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

    प्रकाशित तारीख : December 15, 2025
    Governor’s Secretary Calls for Women’s Active Participation in Swayamsiddha

    स्वयंसिध्दा उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्री शक्ती’ ॲप वरती जास्तीत जास्त नोंदणी करावी : राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

    मुंबई, दि.15 : महिला सशक्तिकरणाच्या उद्देशाने राज्य सार्वजनिक विद्यापीठां अंतर्गत सुरू केलेल्या ‘स्वयंसिध्दा उपक्रमासाठी’ जास्तीत जास्त महिला विद्यार्थीनींना जनजागृती पर उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे तसेच स्वयंसिध्दा उपक्रमासाठी महिलांनी ‘ स्त्रीशक्ती’ ॲप वरती जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे निर्देश माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले

    ‘लोकभवन’ येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंसिध्दा उपक्रमाबाबत दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राम मूर्ती, लोकभवनमधील सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे स्वयंसिद्धा उपक्रम अंमलबजावणीतील राज्य सार्वजनिक विद्यापीठांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणाली द्वारे यावेळी उपस्थित होत्या.

    सचिव डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, माननीय राज्यपाल महोदय यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिध्दा’ हा उपक्रम राबवला जात आहे आजपर्यंत या उपक्रमांमध्ये अनेक महिला सदस्यांनी नोंदणी करून वेब पोर्टल वरती नोंदणी केली आहे त्या महिलांनी देखील स्त्रीशक्ती ॲप वरती नोंदणी करावी.

    सचिव डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, प्रत्येक राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या स्वयंसिद्धां महिला अधिकारी यांच्या नियमीत बैठका घेऊन जे उपक्रम राबवले जात आहेत त्याची आपल्या पोर्टल वरती तसेच प्रत्येक विद्यार्थीनींनी त्यांच्या वैयक्तिक स्वयंसिद्धा मीडिया प्लॅटफॉर्मवरती देखील त्या उपक्रमांची प्रसिद्धी करावी. स्वयंसिद्धातील उपक्रमांमध्ये महिलांना जास्तीत जास्त विविध उपक्रम राबवण्यासाठी सक्रिय करावे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबरोबर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) केलेल्या सामंजस्य करारानुसार स्वयंसिध्दा विद्यार्थीनी या निवडणुकीमध्ये राबवण्यात येणारा ‘स्वीप (SVEEP)’ उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त प्रचार करुन महिलांना मतदानाचा हक्क याबाबत सविस्तर माहिती द्यावी. यासाठी महिला शहरी व ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त जनजागृती पर उपक्रम राबवावेत. मतदानाचा हक्क याबद्दल सविस्तर माहिती महिलांना देण्यात यावी निवडणूक आयोगाच्या ‘स्वीप (SVEEP)’ या उपक्रमासाठी ‘वुमन एम्पॉवरमेंट’ हा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी करावी.

    सचिव डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, महिला बालविकास विभागाने आदिशक्ती या उपक्रमामध्ये स्वयंसिध्दा चा सहभाग नोंदवावा असे आव्हान केलेले आहे. महादेव प्रोजेक्टसाठी महिला फुटबॉल टीम तयार करण्यासाठी स्वयंसिध्दा मार्फत आव्हान करण्यात यावे त्याचप्रमाणे या उपक्रमाची माहिती प्रत्येक महिलेला व्हावी यासाठी निरंतर प्रयत्न करावा त्याचप्रमाणे स्वयं सिद्धांच्या यशोगाथा आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध कराव्यात. ज्या विद्यापीठांमध्ये अधिकाधिक ऍक्टिव्हिटी होत आहेत अशा विद्यार्थ्यांचे रँकिंग काढले जाईल.