बंद

    15.12.2024: राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ

    प्रकाशित तारीख : December 15, 2024
    १५.१२.२०२४: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या मोठ्या विस्तारात ३९ मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन लोक भवन, नागपूर येथे आयोजित शपथविधी समारंभात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. राज्यपालांनी शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार मुंडे, जयकुमार मुंडे आदींचा समावेश होता.

    राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ

    Ø ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधी सोहळा

    Ø मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

    नागपूर, दि.15 : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा पार पडला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती.

    समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अँड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, अँड.माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाठ, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबीटकर यांचा समावेश आहे.

    सोबतच 6 सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यात माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर साकोरे, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याचे संचलन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. सोहळ्यास खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.