15.09.2024: मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन
मुंबई, दि.१५ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाची प्रत व श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून राज्यपालांना दिली.