15.08.2024: स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांचे पुणे राजभवन येथे चहापान
स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांचे पुणे राजभवन येथे चहापान
देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवन पुणे येथील हिरवळीवर गुरुवारी (दि. १५) पारंपरिक स्वागत समारोह व चहापानाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने झाली. राज्यपालांनी सर्व निमंत्रितांशी संवाद साधला व स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
स्वागत समारोहाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ के.एच.संचेती, डाॅ. पराग संचेती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित, सशस्त्र सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार, उद्योजक, प्रशासन तसेच पोलीस सेवेतील अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.