बंद

    15.08.2020: पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: August 20, 2020

    पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

    नववर्षाचा पहिला दिवस, नवरोज, उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.