बंद

    15.03.2022: चीनचे वाणिज्यदूत टँग गोकाई – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: March 15, 2022

    चीनचे वाणिज्यदूत टँग गोकाई – राज्यपाल भेट

    मुंबई येथील आपला ४ वर्षांचा कार्यकाळ संपवून परतत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे निरोप भेट घेतली.
    पुढील वर्षी चीनमध्ये एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप होणार आहे. यानिमित्त टँग गोकाई यांनी राज्यपालांना फुटबॉलची प्रतिकृती भेट दिली. यावेळी उप वाणिज्यदूत वांग यान्हूआ देखील उपस्थित होत्या.