बंद

14.11.2024: पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादन

प्रकाशित तारीख: November 14, 2024
Maharashtra Governor pays tributes to Pt. Jawaharlal Nehru

पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादन

देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. १४) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.