14.11.2024: गुरुनानक जयंती निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
गुरुनानक जयंती निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गुरुनानक जयंती निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
गुरुनानक देव हे एक महान दार्शनिक संत आणि द्रष्टे समाजसुधारक होते. गुरुनानक यांनी समता, बंधुभाव व सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला. त्यांची विश्वबंधुत्वाची शिकवण आज विशेष प्रासंगिक आहे. गुरु नानक जयंतीच्या मंगल पर्वावर मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.