14.09.2025 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत रेल्वेने आगमन

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत रेल्वेने आगमन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे यांचेकडून राज्यपालांचे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर स्वागत
सोमवारी राज्यपालांचा शपथविधी
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे रविवारी (दि. १४) मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले.
अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राज्यपालांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली तर राजभवन येथे पोहोचल्यावर मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.
सोमवार दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.
****