बंद

    14.09.2021: राज्यपालांच्या हस्ते मुंबई ड्रीम्स समाज कल्याण पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: September 14, 2021

    राज्यपालांच्या हस्ते मुंबई ड्रीम्स समाज कल्याण पुरस्कार प्रदान
    खा. गोपाल शेट्टी, कृपाशंकर सिंह, उदित नारायण, ब्रह्मकुमारी योगिनी दीदी सन्मानित
    करोना काळात परोपकार व कृतज्ञतेच्या भावनेचे दर्शन: राज्यपाल

    देशात या पूर्वी प्लेग, मलेरिया, कॉलरा यांसारखी संकटे येऊन गेली. परंतु करोना संकट काळात समाजासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची, परोपकाराची व कृतज्ञतेची सामुहिक भावना प्रथमच पहावयास मिळाली असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

    राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी (दि. १४) राजभवन येथे मुंबई ड्रीम्स समाज कल्याण पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ड्रीम्स प्रकाशन संस्था व सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी खा. गोपाल शेट्टी, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, पार्श्वगायक उदित नारायण, ब्रह्मकुमारी योगिनी दीदी यांसह १७ करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

    धार्मिक प्रवृत्तीचे लोक ईश्वर आराधनेतून जो आनंद प्राप्त करतात तोच आनंद जनसामान्य लोक सेवेच्या माध्यमातून प्राप्त करू शकतात असे सांगून करोना काळात अनेक सेवाभावी संस्थांनी चांगले कार्य केले असे राज्यपालांनी सांगितले.

    कार्यक्रमाला मुंबई ड्रीम्स प्रकाशन संस्थेचे रुद्रप्रताप बिस्वास, सह्याद्री फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष डॉ दिलीपकुमार इंगवले प्रामुख्याने उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते डॉ उल्का नायर, अनिशा सुर्यवंशी, डॉ योगेश दुबे, शेख रिहाज बशीर, डॉ राजकुमार गवाळे, संतोष कुमार देशमुख, डॉ संदीप तांबरे, डॉ अनंत मुळे, अशोक सावंत, विश्वासराव काटमांडे, व अनिता चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.