बंद

    14.07.2022: इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन

    प्रकाशित तारीख: July 14, 2022
    Governor releases biography of ISKCON Founder Srila Prabhupada

    14.07.2022:इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सिंग, डान्स अँड प्रे’ या चरित्रात्मक ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला इस्कॉन बंगलोरचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच अक्षयपात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दास, हरेकृष्ण चळवळीचे मुंबई प्रमुख अमितासन दास व पुस्तकाचे लेखक – पत्रकार हिंडोल सेनगुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.