बंद

    14.04.2026: लोकभवन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : April 15, 2026
    14 04 2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन कर्मचारी वसाहत संकूल येथे आयोजित १३५ व्या डॉ आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळयाला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांचा सत्कार केला.

    लोकभवन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी (दि. १४) लोकभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    Governor pays tributes to Dr Ambedkar at Lok Bhavan