बंद

    13.04.2026: राज्यपालांची समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक

    प्रकाशित तारीख : April 15, 2026
    13.04.2026: महाराष्ट्रातील केवळ एक - दोन विद्यापीठांना आज राष्ट्रीय मानांकनात स्थान आहे. हे चित्र बदलले पाहिजे. राज्यातील समूह विद्यापीठे नवीन असली तरीही त्यांचेशी संलग्न महाविद्यालये जुनी व नामांकित आहेत. त्यामुळे या विद्यापीठांनी राष्ट्रीय विद्यापीठ मानांकनामध्ये आपले मानांकन सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे अशी सूचना  राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज राज्यातील समूह विद्यापीठांना केली. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील चार समूह विद्यापीठांची लोकभवन मुंबई येथे आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. राजनीश कामत, सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी व कुलगुरु डॉ ज्ञानदेव म्हस्के तसेच वारणानगर येथील वारणा विद्यापीठांचे कुलगुरु डॉ डी टी शिर्के तसेच विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते. विकसित भारताचे लक्ष्य गाठताना क्षयरोगाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे असे सांगून समूह विद्यापीठांनी टीबी मुक्त भारत अभियानात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. यासाठी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्था घ्यावी, मराठी व हिंदी भाषेत जिंगल्स स्पर्धा तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावे अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. यावेळी विद्यापीठांनी राज्यपालांसमोर आपल्या विद्यापीठांचे सादरीकरण केले. त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, सर्वोत्तम प्रथा, संशोधन प्रकल्प, कौशल्य अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची नावनोंदणी, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी, देशविदेशातील विद्यापीठांसोबत सुरु असलेले सहकार्य आदी विषयांची राज्यपालांना माहिती दिली

    राज्यपालांची समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक
    विद्यापीठांना आपले राष्ट्रीय मानांकन वाढविण्याच्या सूचना

    महाराष्ट्रातील केवळ एक – दोन विद्यापीठांना आज राष्ट्रीय मानांकनात स्थान आहे. हे चित्र बदलले पाहिजे. राज्यातील समूह विद्यापीठे नवीन असली तरीही त्यांचेशी संलग्न महाविद्यालये जुनी व नामांकित आहेत. त्यामुळे या विद्यापीठांनी राष्ट्रीय विद्यापीठ मानांकनामध्ये आपले मानांकन सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे अशी सूचना राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी सोमवारी (दि. १३ एप्रिल) राज्यातील समूह विद्यापीठांना केली.

    राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील चार समूह विद्यापीठांची लोकभवन मुंबई येथे आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

    बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. राजनीश कामत, सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी व कुलगुरु डॉ ज्ञानदेव म्हस्के तसेच वारणानगर येथील वारणा विद्यापीठांचे कुलगुरु डॉ डी टी शिर्के तसेच विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते.

    विकसित भारताचे लक्ष्य गाठताना क्षयरोगाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे असे सांगून समूह विद्यापीठांनी टीबी मुक्त भारत अभियानात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. यासाठी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्था घ्यावी, मराठी व हिंदी भाषेत जिंगल्स स्पर्धा तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावे अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    यावेळी विद्यापीठांनी राज्यपालांसमोर आपल्या विद्यापीठांचे सादरीकरण केले. त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, सर्वोत्तम प्रथा, संशोधन प्रकल्प, कौशल्य अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची नावनोंदणी, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी, देशविदेशातील विद्यापीठांसोबत सुरु असलेले सहकार्य आदी विषयांची राज्यपालांना माहिती दिली.
    **
    राज्यपाल की समूह विश्वविद्यालयों के कुलगुरुओं के साथ बैठक
    विश्वविद्यालयों को राष्ट्रीय मानांकन बढ़ाने के निर्देश
    महाराष्ट्र के राज्यपाल तथा विश्वविद्यालयों के कुलाधिपति जिष्णु देव वर्मा ने कहा कि वर्तमान में राज्य के केवल एक-दो विश्वविद्यालय ही राष्ट्रीय मानांकन में स्थान प्राप्त कर पाए हैं, और इस स्थिति में परिवर्तन होना चाहिए।

    उन्होंने कहा कि यद्यपि समूह विश्वविद्यालय अपेक्षाकृत नए हैं, लेकिन उनसे संबद्ध महाविद्यालय पुराने और प्रतिष्ठित हैं।

    इसलिए इन विश्वविद्यालयों को राष्ट्रीय स्तर पर अपनी रैंकिंग सुधारने के लिए गंभीर और सतत प्रयास करने चाहिए।

    राज्यपाल सोमवार (13 अप्रैल) को मुंबई स्थित लोक भवन में आयोजित राज्य के चार समूह विश्वविद्यालयों की समीक्षा बैठक में बोल रहे थे।

    बैठक में एचएसएनसी विश्वविद्यालय की कुलगुरु डॉ. हेमलता बागला, डॉ. होमी भाभा राज्य विश्वविद्यालय के कुलगुरु प्रो. राजनीश कामत, सातारा स्थित कर्मवीर भाऊराव पाटील विश्वविद्यालय के प्रोवोस्ट चंद्रकांत दलवी एवं कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के, तथा वारणानगर स्थित वारणा विश्वविद्यालय के कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के सहित विश्वविद्यालयों के अन्य अधिकारी उपस्थित थे।

    राज्यपाल ने विकसित भारत के लक्ष्य की प्राप्ति के लिए क्षयरोग (टीबी) के समूल उन्मूलन पर जोर देते हुए कहा कि समूह विश्वविद्यालयों को “टीबी मुक्त भारत अभियान” में छात्रों की सक्रिय भागीदारी सुनिश्चित करनी चाहिए।

    उन्होंने सुझाव दिया कि विश्वविद्यालय पोस्टर प्रतियोगिताएं, मराठी और हिंदी में जिंगल प्रतियोगिताएं तथा अन्य नवोन्मेषी गतिविधियां आयोजित करें।

    बैठक के दौरान विश्वविद्यालयों ने अपने-अपने संस्थानों की प्रस्तुतियां दीं, जिनमें राष्ट्रीय शिक्षा नीति के कार्यान्वयन, नवाचारी पाठ्यक्रम, श्रेष्ठ प्रथाएं, अनुसंधान परियोजनाएं, कौशल आधारित पाठ्यक्रम, छात्र नामांकन, विशिष्ट उपलब्धियां तथा देश-विदेश के विश्वविद्यालयों के साथ सहयोग संबंधी जानकारी दी गई।

    **